March 14, 2025

GALLERY

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या  वतीने 12 मार्च 2025 दादर या ठिकाणी उद्योजक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक श्री रामकृष्ण हरीशेठ कोळवणकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर  गिरीश कोळवणकर, संस्थेचे विश्वस्त संजय भाट, विष्णू सातवसे, चंद्रकांत खाडये उद्योजक राज साडविलकर, वैश्य सहकारी  बँकेचे संचालक प्रकाश साडविलकर, संजय कोळवणकर, संतोष भालेकर राजेंद्र खाडे, संजीव शिरसाठ   आदी मान्यवर उपस्थित होते 

 130 + उद्योजकांनी  कार्यक्रमाला उपस्थित राहून एकमेकांंचा व्यवसाय वाढवण्यासाठी परिचय करून घेतला. अतिशय उत्साहात, आनंदात, जल्लोषात उद्योजक मार्गदर्शन मेळावा पार पडला. कार्यक्रमासाठी विरार वसई कल्याण डोंबिवली पनवेल अंबरनाथ एवढया लांबून लोक आले होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी शिस्तीचे पालन केले. एकच ध्यास वैश्य समाजाचा विकास या घोषणेने सारा सभाग्रह दुमदुमला शेवटी सर्वांनी एकमेकांना भेटत लवकरच पुन्हा असा मोठा कार्यक्रम करण्याचा संकल्प करून राष्ट्रगीताने समारोप झाला.

ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, ६ ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा संपन्न झाला. या भव्य प्रदर्शनात ‘वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट’ चा सहभाग लक्षवेधी ठरला व अनेक प्रतिष्टित उद्योगपतींनी आपल्या स्टॉलला भेट दिली त्यातील काही क्षणचित्रे.तसेच ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून VGCT तर्फे सर्व महिला सदस्यांना ‘सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले.

मी उद्योजक कार्यक्रमात BSE येथे पुरस्कार स्विकारताना “वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट” चे सभासद 💐🏆 उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, आमदार प्रसाद लाड, डॉ सुरेश हावरे , संजय यादवराव, राजेंद्र सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत VGCT चे अध्यक्ष आणि सभासदांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.संतोष कामेरकर, उपाध्यक्ष श्री.दिपक मेजारी, सचिव सौ. रुपाली तेलवणे यांनी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना संस्थेच्या वतीने मानचिन्ह दिले आणि संस्थेची माहिती दिली लवकरच समाज हितासाठी एखादा प्रस्ताव घेऊन पुन्हा भेट घेणार आहोत.

VGCT ची आज ची आयोजित बडी मिटिंग अंग्रेजी ढाबा येते खूप छान पद्धतीत पार पडली.

 चंद्रकांत खाडे सर, राज साडविलकर सर यांनी खूप छान पद्धतीत मार्गदर्शन केले, संजीव शिरसाट यांनी संस्थेबद्दल माहिती सांगितली, दुर्वांक कामेरकर आणि धनिता रेडीज यांनी युवा उद्योजकांबद्दल माहिती दिली.

आजच्या बडी मिटिंग मध्ये 30 पेक्षा जास्त मेंबर उपस्तिथ होते आणि जवळजवळ 30 पेक्षा जास्त रेफरन्सेशन share केले, Done Deal जी झालेली आहे त्याची Amount 12 लाखापेक्षा जास्त होती.

 राज साडविलकर यांनी मिटिंग साठी जागा उपलब्ध करून दिली त्याशिवाय आजचा स्नॅक्स चहा पण त्यांनी अरेंज केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. स्वागता हर्याण यांनी मेथीचे आणि तिळाचे लाडू वाटले त्याबद्दल त्यांचे ही मनापासून आभार.

दि.१९ जानेवारी २५ रोजी नालासोपारा येथे संपन्न झालेल्या हळदी-कुंकू समारंभात वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपला निमंत्रण देउन प्रतिनीधींचा विशेष सत्कार केला.

दि. १६ जानेवारी २५ रोजी बोरिवली येथे मकरसंक्रांत च्या निमित्ताने वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप ची मीटिंग पार पडली.

‘लक्ष २०२५’ या वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या प्रथम यशस्वी मेळाव्याचे विविध प्रवृत्तपत्रांनी केलेले वृत्तांकन

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे सत्कार आणि शुभेच्छा पत्रे

लक्ष्य- २०२५ , १२ जानेवारी वैश्य समाज्याच्या भव्य मेळाव्यातील काही क्षणचित्रे

वैश्य समाजाचा भव्य मेळावा- लक्ष्य- २०२५ या सोहळ्याची विविध वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या

Vaishya Global Business Group च्या कॅलेंडर चे प्रकाशन श्री.विवेक माणगावकर यांच्या बोरिवली कार्यालयात सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

वैश्य ग्लोबल संस्थेची मीटिंग, येउर- ठाणे.

श्रीमंत व्यावसायिकांची सहल, श्रीमंतीत, उत्साहात आणि दिमाखात पार पडली.

66 प्रतिष्ठित उद्योजक व समाज बांधव उपस्थित होते 🚎बस मधे ढोलकीच्या तालावर गाणी गात, नाचत, एकमेकांशी संवाद साधत खुप सार खाऊ खात, चविष्ट वेज-नॉनवेज जेवणावर ताव मारत फुल टु धमाल केली.

विशेष म्हणजे 8 वैयक्तिक 🚗 वाहने व 1 🚎 बस मधुन समाज बांधव सहलीला खुप लांबून लांबून आले होते.

सामाजिक बांधिलकी जपत आम्ही 🌱🌳 वृक्षारोपण ही केले. झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प ही केला.

एकच ध्यास, वैश्य समाजाचा विकास

Member Development Program (MDP-2) held on 22nd June 2024 at Thane.

वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप सभासद मिटिंग, ठाणे – जून 2024

Member Development Program (MDP) held on 1st June 2024 at Thane.

Members Development Program (MDP) Thane

वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप सभासद मिटिंग, ठाणे – 19 मे 2024

कोल्हापूर येथे 12 जानेवारी 2024 रोजी झालेल्या भव्य उद्योजक मेळाव्यातील क्षणचित्रे

Vaishya Global Youtube Channel आणि Website चे उद्घाटन करताना..प्रसिद्ध उद्योगपती विवेक मांणगांवकर , राजाभाऊ पाटकर, दीपक मेजारी, डॉ.संतोष कामेरकर, महेश म्हात्रे, अनिरुद्ध शेट्ये व इतर मान्यवर.
आपल्या समाजातील हुशार, यशस्वी व्यावसायिक व्यापारी उद्योजक, उद्योगपती यांच्या यशोगाथा, मुलाखती आणि उद्योजकांना उपयोगी अतिमहत्त्वाची माहीती व योजना आपल्या YOUTUBE Channel वर पहावयास मिळतील.

दिनांक १२ व १३ एप्रिल २०२४ रोजी लोणावळा येथे झालेल्या दुसऱ्या उद्योजकता विकास निवासी शिबिरातील क्षणचित्रे

दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी लोणावळा येथे झालेल्या पहिल्या उद्योजकता विकास निवासी शिबिरातील क्षणचित्रे

संस्थेच्या व्यावसायिक बैठका, मेळावे तसेच वृत्तपत्रातील बातम्या यांची क्षणचित्रे:-