‘टीमवर्क’ म्हणजे एक विशिष्ट 🎯 ‘ध्येय’ साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून त्या ध्येयासाठी झटणाऱ्यांचा समूह होय!
टीम बरोबर काम करताना सर्व लोकांशी नातेसंबंध जोपासून त्यांच्याकडून आपल्याला हवे असणारे काम त्यांच्या मर्जीनुसार आणि आवडीनुसार करून घेणे म्हणजेच टीमवर्क.
T.E.A.M. या शब्दाचा अर्थ….
T = Together ….
E = Everyone …
A = Achieve …
M = More …
आपण आज “सांघिक कार्य व स्नेहसंबंध” जोपासून कशाप्रकारे चांगले व मोठे काम उभे करू शकतो हे पाहणार आहोत.
टीम वर्क चे उत्तम उदाहरण म्हणजे गोविंदा-दहीहंडी यामध्ये एकावर एक थर लावून सर्वात वरच्या थरावरील माणूस दहीहंडी फोडतो त्यावेळेस हंडी फोडणारा माणूस आपल्याला दिसतो परंतु त्याला वरपर्यंत जाण्यासाठी मदत करणारे खाली असणारे सहा ते सात थर हे खूप महत्त्वाचे असतात त्यामुळेच सर्वात वरील माणूस ती हंडी फोडतो.
कोणतंही मोठं काम/कार्य मोठी संस्था, कंपनी, संघटना आपण पाहतो त्याच्या यशामध्ये संपूर्ण टीमचा मोठा हातभार असतो त्यामुळेच ती संस्था मोठी होत असते.
“सहकार क्षेत्र” याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे अनेक लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करून एखादी संस्था, बँक, संघटना चालवतात आणि लाखो लोकांचा त्यामुळे फायदा होतो.
सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे मुख्य कारण म्हणजे सांघिक कार्य होय!
खो-खो, क्रिकेट, फुटबॉल या खेळांमध्ये देखील टीम वर्क ला खूप महत्त्व आहे.हे आपण पाहत आलेले आहोत, टीमवर्क मुळे मोठ्यात मोठं काम सहज शक्य होतं. कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधील सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जोर लावून, योग्य नियोजन, सातत्याने कठिण परीश्रम करुन काम केल्यास ते निश्चितच पूर्ण होते.
सांघिक काम करताना प्रत्येक टीम मध्ये एखादा लीडर असावा लागतो जो आपल्या टीम कडून काम करून घेत असतो एखादे कार्य यशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय उत्तम ‘लीडर’ हा आपल्या टीमला देत असतो. त्यामुळे त्याची टीम नेहमी त्याच्या सोबत राहून पुढील कार्यही चांगल्या प्रकारे पार पाडत असते.
सांघिक कार्य ही संस्थात्मक कामाची मूलभूत गरज आहे.
आपल्या टीम कडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्यासाठी खालील गोष्टी अमलात आणाव्यात…
-टीम मधील व्यक्तीने अन्य सहकाऱ्यांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. टीममध्ये राहून आपले वेगळेपण टिकविणे हे ही एक कौशल्य आहे.
-आपल्या टीम मधील लोकांशी
मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग करण्यापेक्षा व्हिडीओ कॉल करा. अन्यथा त्यांना समोरासमोर भेटा. समोरासमोर बोलण्यानं आपण किती सहजतेनं बोलू शकतो हे समजतंच. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याची चांगली संधी मिळते.
-केवळ स्वतःच्या आवडीच्या नाही तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. समजा दुसऱ्या विषयांबाबत जास्ती माहिती नसेल तर निराश होऊ नका, माहितीसंग्रह वाढवण्यासाठी उत्सुक व्हा!
दुसऱ्यांकडून नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
- लोकांशी चर्चेत सामील व्हा. स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल.
- तुम्ही बोलायला उत्सुक आणि तयार आहात असे तुमच्या वागण्यातून दाखवून द्या. यामुळे दुसऱ्यांना तुमच्याशी बोलणं सोपं जाईल.
- बोलताना नेहेमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोला.
- टीम शी संभाषण सुरु ठेवण्यासाठी त्या संबंधित प्रश्न विचारात रहा.
- टीम शी संवाद साधणं हे जरी त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटलं तरीसुद्धा सहज हार मानू नका. सध्याचे जग हे वेगवान आहे आणि लोकांच्या आठवणी देखील अल्पकालीन आहेत. त्यामुळे वारंवार टीम बरोबर संवाद करत रहा.
-टीम बरोबर काम करताना योग्य संवाद साधणं गरजेचं असतं.
संवाद साधणं हे एक कौशल्य असून हे कौशल्य विकसित होण्यासाठी बराच कालावधी लागतो.
-चर्चे दरम्यान आपले मत मांडताना उद्धटपणा आणि आक्रमकपणा यांमधील सीमारेषा धूसर आहे, हे लक्षात ठेवा.
-आपले म्हणणे अतिशय प्रभावीपणे लिहून ही द्या. त्यावर टीममधील सहकाऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे याचेही निरीक्षण करा.
-विशिष्ट कार्ये करण्यासाठी प्रत्येक संस्थेची अनेक संघांमध्ये विभागणी केली जाते.
-समोरच्यांचे मत ऐकून आपले मत (जर आपण त्यावर ठाम असू तर) बदलू नका.
-टीम मध्ये चर्चा होत असताना तसेच दुसरे लोक बोलत असताना मोबाइल, लॅपटॉप यांवर आपली कामे करू नका.
-राग येणे, संतप्त होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र, रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. रागामुळे आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते टीम मध्ये काम करत असताना शांतपणे विषय समजून घेणे आणि रागावर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे असते.
-कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ला सर्वाधिक महत्त्व असते. त्याशिवाय ध्येय गाठता येत नाही.
-आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो.
-टीम मधील इतरांना यश मिळाल्यास त्याचाही आनंद व्यक्त करा. सहकाऱ्याला अपयश आल्यास त्याला धीर द्या. त्याचं मनोधैर्य वाढवा.
-लोकांना प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, प्रशिक्षण द्या, शाबासकी द्या! यामुळे टीम मध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत असते.
असे अनेक लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगवर विजिट करा..
- डॉ.संतोष कामेरकर
लेखक, उद्योजक,मेंटोर,
बिजनेस व लाइफ कोच
7303445454