March 14, 2025

 वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, शिकाल तर टिकाल आणि टिकाल तरच जिंकाल !             

*📌आपण एक वाक्य🗣️ ऐकल आहे, ते उद्योजकांच्या बाबतीत तर अत्यंत लागू पडते. उद्योजक आणि वाचन हे समीकरण असायला हवे. कारण वाचनाशिवाय उद्योजक घडू शकत नाही त्यामुळे जगाच्या दृष्टीने वाचन या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.* 

*👉 उद्योजकतेच्या बाबतीतही काही पुस्तके वाचता येतील अशी सर्व पुस्तके आपण वाचली पाहिजेत. जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योजकतेची माहिती आपणास मिळेल. कारण हल्ली प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन करणे शक्य नसते. त्यामुळे काही वाचले तर त्या पुस्तकांच्या ज्ञानाच्या आधारे आपण आपल्या उद्योगांमध्ये येणाऱ्या अडचणी या व्यवस्थितपणे सोडवू शकतो.*

😎 *_बिल गेट्स हे कंपल्सरी आठ दहा पानं दररोज पुस्तकाचे वाचन करतात, ते सांगतात की त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी इंटेलिजंट इन्वेस्टर हे वाचल्यानंतर केली._*

*📕 म्हणजेच एकंदरीत उद्योजकांच्या बाबतीत वाचणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे उद्योजकीय साहित्य काही मिळाले तर आपण ते जरूर वाचले पाहिजे कारण या उद्योजकीय साहित्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती तर घडतेच त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या अडचणी, संभाव्य अडचणी याबद्दल आधीच कल्पना किंवा आधीच त्याची माहिती मिळाली असल्यामुळे आपण त्या सहजपणे सोडवतो.*

 *📘उद्योजकाच्या आयुष्यामध्ये वाचन हा एक अविभाज्य भाग असायला पाहिजे काही मुख्य वाचण्याचे फायदे आपण खालील प्रमाणे पाहू.*

✒️ *१) मेंदूची कल्पना शक्ती सुधारते*

वाचल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये वेगळे प्रकारचे विचार घेऊन आपण जे वाचतो आहे त्याची कल्पनाशक्ती करण्याची ताकद ही मेंदू मध्ये असते आणि वाचनामुळे ही सुधारते ,आणि सुधारल्यामुळे मेंदूची क्रिएटिविटी वाढते आणि आपल्या व्यवसायात उपयोग होतो.

✒️ *२) संभाषण कौशल्य*

व्यवसाय मध्ये संभाषण कौशल्य हे प्रचंड महत्त्वाचे आहे वाचल्यामुळे आपल्याला शब्दासंग्रह वेगळ्या शब्दांची भर पडते आणि त्यामुळे आपण संभाषण करत असताना हे शब्द आपल्या बोलण्यात येत असतात त्यामुळे आपले संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होते.

✒️ *३) ज्ञान साठा वाढतो*

वाचनाचा आणखीन एक सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान साठा वाढतो. आपल्याकडे उपलब्ध असलेले ज्ञान हे कुठल्या ना कुठल्या त्या गोष्टीतली मार्फत येत असते, तसेच आपण पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. तेवढी जास्त पुस्तके आपण आपल्या ज्ञानसंग्रह मध्ये भर पडत जाते.

✒️ *४) स्मरणशक्ती सुधारते*

आपण वाचलेल्या गोष्टी परत परत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळून आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती आपला व्यवसाय मध्ये सुद्धा उपयोगी पडत असते, काही केलेली कामं असतात किंवा काही राहिलेली कामं असतात ही काम योग्य वेळेस पाठवून केली तर त्याचा फायदा होतो त्यामुळे स्मरणशक्ती वाचनाचा फायदा आहे.

✒️ *५) एकाग्रता वाढते*

वाचन करत असताना आपला मेंदू आणि आपले डोळे आणि आपल्या डोक्यात विचार हे त्या पुस्तकावर केंद्रीत झालेले असतात त्यामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते व व्यवसाय मध्ये ही एकाग्रता खूप महत्त्वाची असते.

– डॉ.संतोष कामेरकर