परिवर्तन-(बदल) यशाचा मार्ग ..
“बदल” हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे.
त्यामूळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्विकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल!त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकते मध्ये अडकून पडू नका. त्यामूळे बोअर व्हाल. अयशस्वी होत असताना सुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एक प्रकारच्या अंतरीक उर्जेमूळे.
या अपयशातूनच या कंपन्या प्रगती साधत असतात ते कशामूळे? कारण बिझनेस मधले अपयश हे तुम्ही प्रयत्न करता आहात याचे प्रतीक असते.
ते नव्या पद्धतीने कंपन्यांची पुन्हा रचना करत असतात. नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात. नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करीत असतात.आता सॅमसंगचेच पहा. त्यांनी कित्येक असे बिझनेस केले की त्यांचा परस्पराशी काही संबंध नाही. पण परिस्थितीनूसार ते बदलत गेले. नवीन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रवेश करत गेले व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत गेले. स्वतःच्या कंपन्यांचा नव्याने शोध घेत नवीन कल्चर आत्मसात करत गेले. बदल हाच आयुष्यातील भाग आहे हे लक्षात ठेवा.
🏆यशाचा कोणताही एकच परफेक्ट फॉर्म्युला नाही.
त्यामूळे सतत प्रयत्न करत रहा. योग्य वेळी बदल करत रहा. केव्हा ना केव्हातरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा. आपला बिझनेस किंवा उद्योग व्यवसाय यशस्वी करा! आयुष्यात यश मिळवा!
अर्थात आपण आयुष्यात व बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे
नाही का?
मी तर खुप बदल केले आहेत
माझ्या कामात,स्वभावात, राहणीमानात व व्यवसायात
तुम्हीही पहा बदल करुन…
व्यवसाय मार्गदर्शनासाठी माझी काय मदत लागली तर नक्की संपर्क करा.
तुमचा मित्र
-डॉ संतोष कामेरकर
लेखक, उद्योजक, मेंटॉर,
बिझनेस कोच