March 14, 2025

यशस्वी होण्यासाठी…

यशस्वी होण्यासाठी…🏆
चांगल्या सवयी लावून घेणे, ज्ञान मिळविणे, श्रीमंत व यशस्वी लोकांसोबत राहणे, सकारात्मक विचारसरणी, कामाचे नियोजन करणे, व्यवसाय वृद्धी संदर्भात कायम विचार करणे, फोकस असणे, मार्केटिंग आणि विक्री कौशल्य यात प्राविण्य मिळविणे, इतरांना मदत करण्यास तत्पर राहणे, कृतज्ञता व्यक्त करणे. यासारख्या गोष्टी आपल्याला यशस्वी होण्यासाठी अतिशय उपयुक्त पडतात…

✅ गरिबी आणि श्रीमंती आपल्या विचारातूनच निर्माण होते!

✅ जेंव्हा संपत्ती आणि श्रीमंती येण्यास प्रारंभ होते तेंव्हा ती एवढ्या श्रीघ्रगतीने येते की एवढी वर्ष ती कुठे लपून बसली होती याचं आपल्याला आश्चर्य वाटतं!

✅ निश्चित उद्देश, विशिष्ट मानसिकता, श्रीमंतांसारखा दृष्टिकोन आणि श्रीमंत मानसिकता असली की अगदी थोड्या कष्टानं तुम्ही श्रीमंत होऊ शकता! फक्त अंग मेहनतीने (हार्ड वर्क) नव्हे, स्मार्टवर्क करून आपण यशस्वी होऊ शकतो.

“वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप” (VGBG) या चळवळीच्या/ संकल्पनेच्या माध्यमातून आपण अशा अनेक गोष्टी शिकणार आहोत, करणार आहोत ज्या आपल्याला यशस्वी व श्रीमंत बनवतील.

“कॉफीला दूध आणि साखर मिळेपर्यंत त्याची चव कशी आहे हे कळत नाही. त्याचप्रमाणे आपण एक व्यक्ती म्हणून चांगले असू शकता, परंतु जेव्हा आपण सर्वोत्तम लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा आपण आणखी चांगले होतो. तुमच्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं आहे.”
सकारात्मक उद्योजकीय मानसिकता, इतरांना मदत करण्याची भावना, समविचारी व्यक्तींनी वैश्य व्यावसायिक व्यापारी उद्योजकांसोबत रहा आणि यशस्वी व्हा!

आपल्या समाज बांधवांना फोन करा त्यांचा बिजनेस समजून घ्या! तुमचा बिजनेस त्यांना समजवा. जमेल तेवढी जमेल तशी मदत करा, व्यावसायिक संधी निर्माण करा.

  • डॉ.संतोष कामेरकर आणि सहकारी

“एकच ध्यास.. वैश्य समाजाचा विकास…”