March 14, 2025

पुढाकार घ्या ! यशस्वी व्हा!!🏇

यशस्वी व्हा.. !🏆आज स्पर्धेच्या युगात तुम्हाला यश संपादन करण्यासाठी तुम्ही करता आहात त्या विषयाबद्दल किंवा त्या कामाबद्दल आणि स्वत:बद्दल कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यात कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही या शर्यतीत हरलात म्हणून समजा. कॉन्फिडन्स असणारे लोक काय करतात, हा ही एक महत्त्वाचा विषय आहे. हे लोक स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून असतात आणि त्या विश्वासाच्या सोबतीने ते यश मिळवण्याची शाश्वती ठेवतात. कॉन्फिडन्स असणारे लोक काय ❌करत नाहीत, हा ही ते काय करतात, यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे.

👉 कारणे देत नाहीत :
वेगवेगळी कारणं देऊन पळवाटा काढणारे लोक खूप असतात. ज्या लोकांकडून काहीच होऊ शकत नाही, ते लोक पळवाटा शोधत असतात. कॉन्फिडन्स असणारे लोक जे करतात आणि जे वागतात, ते स्वत:च्या विचारांनी वागतात. त्याची जबाबदारी घेतात. ते कधीही माझ्याकडे वेळ नाही. मला बरं नाही, अशी फालतू कारणं देत बसत नाहीत.

👉 तुलना करीत नाहीत :
आत्मविश्वासू लोक कधीच दुस-याची स्वत:शी तुलना करत बसून वेळ वाया घालवत नाहीत. ते आपण काय करत आहोत किंवा आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार करीत असतात. दुस-यांनी काय केले किंवा दुसरे काय करणार आहे यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे, यावर ते जास्त लक्ष केंद्रित करतात. दुस-याशी तुलना करत बसणं, हे मूर्खपणाचं लक्षण आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

👉 कम्फर्ट झोन टाळतात :
कम्फर्ट झोनमध्ये माणूस आळशी होतो. त्रासाला दूर करून अलगद राहण्याची सवय या कम्फर्ट झोनमुळे लागते. बरेच लोक आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची कामे करत नाहीत. आत्मविश्वासू लोक कम्फर्ट झोनमध्ये कधीच स्वत:ला अडकवून घेत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की कम्फर्ट झोन हा आपल्या स्वप्नांना मारून टाकतो.

👉 कामे पुढे ढकलत नाहीत :
आज माझ्याकडे वेळ नाही. आज माझा मूड नाही, असं म्हणून आजची कामे पुढे ढकलली जातात. आत्मविश्वासू माणसे कधीही आजची कामे दुस-या दिवसावर ढकलत नाहीत. ते कधीही योग्य वेळेची किंवा योग्य परिस्थितीची वाट बघत बसत नाहीत. ते आजची कामं आजच करण्यात विश्वास ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं की यातच प्रोग्रेस आहे.

👉 कोण काय बोलतं, याचा विचार करत नाहीत :
बहुधा ऑॅफिसेसमध्ये सहकारी लोकांच्या मागे त्यांच्यावर टीका करणं चालू असतं. आत्मविश्वासू लोक कधीच इतरांच्या वाईट गॉसिप्समध्ये सहभागी होत नाहीत. ते स्वत:ला स्वत:च्या कामात गुंतवून ठेवतात, ते इतरांच्या फाटक्यात कधीच पाय घालत नाहीत. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. आपल्याबद्दल कोण काय बोलतात, याचा कधीही हे लोक विचार करत नाहीत.

👉 पुढे पुढे करत नाहीत :
प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला आपण चांगलेच वाटायला हवे किंवा त्यांच्याशी अधिक जवळीक साधायला हवी, असं वाटत नाही. प्रत्येक भेटणाऱ्याच्या होत हो मिळवत नाहीत. त्यांना हे माहिती असतं की जीवनात भेटणारे सगळेच लोक नेहमीसाठी सोबत नसतात. आणि जीवन असंच चालतं. आपले रिलेशन किती लोकांशी आहे, यापेक्षा ते किती चांगले आहेत, याकडे ते लक्ष देतात.

👉 बडेजाव नाकारतात :
आत्मविश्वासू लोकांना सतत दुस-याकडून स्वत:चा मोठेपणा ऐकण्याची गरज किंवा सवय नसते. त्यांना माहिती असतं की जीवन हे कधीच सरळ नसतं. जे आता आहे, ते नेहमीसाठी तसंच राहील याची शाश्वती नसते. असे लोक त्यांची शक्ती-बुद्धिमत्ता सकारात्मक पद्धतीने कामी लावतात. जेणेकरून त्यांचं जीवन ते पुढे नेऊ शकतील.

👉 सत्य नाकारत नाहीत :
जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून पळून न जाता, समोर आलेल्या अडचणीने आयुष्य आणखी अवघड होऊ न देता, धैर्याने त्याचा सामना करण्याची शक्ती आत्मविश्वासू लोकांकडे असते. जीवन जगत असताना किंवा काम करत असताना काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज त्यांना असतो. त्यानुसार ते आधीच उपाययोजना करून ठेवतात.

👉 अपयशाला घाबरत नाहीत :
आत्मविश्वासू लोक हे कधीही अपयशाला घाबरत नाहीत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, या सत्यापासून ते कधीही दूर जात नाहीत. ते सतत अपयशाचे कारण शोधत असतात. आणि पुढच्या वेळी अपयश येणार नाही, यादृष्टीने पावले उचलतात. अपयशाची कारणे त्यांना सापडली की ते चुका सुधारून पुन्हा नव्याने उभे राहतात.

👉 कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत :
आत्मविश्वासू लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी कधीही कुणाच्या सांगण्याची गरज पडत नाही. ते बिनधास्तपणे त्यांना जे करायचे आहे ते करतात. प्रत्येक दिवशी ते स्वत:ला आठवण करून देतात की, ‘जर मी नाही करणार तर कोण?’.

👉 स्वत:ला बंदिस्त करीत नाहीत :
आत्मविश्वासू लोक कधीच स्वत:ला एका लहान टूलबॉक्स मध्ये बांधून ठेवत नाहीत. ते काहीही करताना त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण प्रभावीपणे वापरतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वत: जवळ असलेले सगळे ज्ञान ते यश मिळवण्याचे नियोजन करण्यात करतात. हे करणार नाही, ते करता येत नाही, असं ते कधी म्हणत नाहीत.

👉डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत :
आज इंटरनेटवर हजारो लेखक वेगवेगळ्या विषयांवरील लेख लिहितात. त्यांचं वाचनही मोठय़ा प्रमाणात होतं. पण आत्मविश्वासू लोक एखाद्या लेखकाने लिहिलेल्या किंवा मांडलेल्या विचारावर डोळेझाकपणे विश्वास ठेवत नाहीत. ते स्वत:च्या विचाराने जे लिहिले आहे, ते तपासून बघतात. त्यांना माहिती असतं की कुणी काय लिहिलं आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे, त्यानुसार वागावे की नाही, याचा विचार फक्त आत्मविश्वासू व्यक्तीच करू शकते, कारण आत्मविश्वासू लोकांना आत्मविश्वास काय असतो,
हे चांगलेच माहिती असते.
या जगामधे आत्मविश्वासाने वागा!
डाॅ.संतोष कामेरकर यांची🏂”नेत्रुत्व विकास” “लिडरशिप” कार्यशाळा एप्रिल 2024 मध्ये होणार आहे.आजच नाव नोंदणी करा.📞7303445454
💰श्रीमंती व यशाचे फॉर्मुले देणारा व आत्मविश्वास जागृत करणारा
आपला मित्र-💉डॉ.संतोष कामेरकर
बिज़नेस & लाइफ कोच
✅आवडले ना मग फॉरवर्ड करा➡