March 14, 2025

“उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा!”

15-20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा, छोटा असेल तरी चालेल परंतु व्यवसाय करा.

व्यवसाय छोटा किंवा मोठा कधीच नसतो तुमच्या अथक प्रयत्नाने आणि विविध कौशल्य आत्मसात करून व्यवसाय कमी कालावधीत मोठा करता येतो आणि करोडो रुपये कमवता येतात
यासाठी…
बदलावे लागेल, स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागेल, सकारात्मक उद्योजकीय मानसिकता आणावी लागेल, सकाळी लवकर उठावे लागेल, आळसपणा सोडावा लागेल…चांगल्या कल्पनेत आणि विचारात “आयुष्य” बदलण्याची ताकद असते. यामुळेच माझे जीवन वेळोवेळी सकारात्मक विचाराने बदलले आहे, तुम्हालाही कायम सकारात्मक विचार करावे लागतील.
नेपोलियन हिल च्या म्हणण्यानुसार… कल्पना हे सर्व भाग्याचा प्रारंभ बिंदू आहेत.
छान कल्पना आणि विचारांमुळे माझे जीवन अधिक अर्थपूर्ण, मनोरंजक आणि रोमांचक बनले आहे.
माझ्या जीवनातील यशासाठी
मी अभ्यास केलेल्या महान पुस्तकांना याचे श्रेय देतो.
एक चांगले पुस्तक किंवा अगदी “कोट” हे एक साधन आहे
जे तुमच्या कल्पनाशक्तीला प्रज्वलित करू शकते, तुम्हाला ते घेण्यास, कृती करण्यास प्रवृत्त करू शकते.
कृती करा आणि तुम्ही स्वतःला जीवनात पुढील स्तरावर जाण्यासाठी प्रेरित करा.
मी “कोट्स” गोळा करतो, जे मला आवडतात आणि ते मी लिहून काढतो व इतरांना ही पाठवतो.
सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्या! व्यायाम करा, मेडिटेशन करा, पुस्तक वाचा, विजुलायझेशन करा, सकारात्मक विचार करा, कामाचे नियोजन करा.
📖 वाचनाच्या, लिहिण्याच्या आणि लवकर उठण्याच्या सवयीमुळेच मी आज 15 पुस्तक लिहू शकलो, यशस्वी होऊ शकलो.

  • डॉ.संतोष कामेरकर
    लेखक, उद्योजक, मेंटोर, लाइफ व बिजनेस कोच