March 15, 2025

उद्योजक घडविण्याची चळवळ मोठी करूया…

उद्योजकता महत्वाची आहे. आर्थिक वाढ, परिवर्तनाला चालना, नवीन बाजारपेठांची निर्मिती,नवकल्पना आणि संपत्ती निर्माण करण्याचे प्रमुख चालक म्हणून उद्योजकतेला वारंवार श्रेय दिले जाते. नवीन उत्पादने तयार करताना कल्पना विकसित करण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी उद्योजक बहुतेकदा महत्त्वाचे असतात.

उद्योजक देशाची संपत्ती निर्माण करतो, उद्योजक अनेकांना रोजगार देतो, नफा हा उद्योगाचा अविभाज्य अंग आहे. प्रामाणिकपणे उद्योग करा, मोठा नफा मिळतो. उद्योजक हा देशाच्या विकासाचा कणा आहे.
संघटित होणे व उद्योग शृंखला निर्माण करणे ही उद्योगाची आवश्यकता आहे.
पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरायला लागते त्याच प्रकारे उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम उद्योग करायला सुरुवात करावी लागते.
उद्योगात पावलोपावली अडचणी येतात आवश्यकता असते ती त्यातून मार्ग काढण्याची त्यासाठी त्या उद्योजकाला योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो अडचणी वरती मात करून यशाचे शिखर गाठू शकतो. वैश्य समाजातील उद्योजकांमध्ये उद्योग शुंखलेचा अर्थात नेटवर्किंगचा अभाव दिसून येतो, नेटवर्किंगचे अनेक फायदे आहेत. “एकमेकां सहाय्य करू” ही भावना जोपासली तर सर्वांना मोठं होता येत, एकत्रितपणे यंत्रसामग्री, लागणाऱ्या इतर वस्तू इत्यादींच्या खरेदीत सर्वांना फायदा होतो, एकत्र येऊन मोठी योजना आखणे किंवा मोठा प्रकल्प उभारणे असे फायद्याचे उद्योग यातून करता येतात.
जे उद्योजक मोठे झाले त्यांच्या यशात या उद्योग शुंखलेचा मोठा हिस्सा आहे.
“धंदा तुमचा, पैसा दुसऱ्याचा” म्हणजेच गुंतवणूकदार, बँका यांच्याकडून पैसे घेऊन आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो.
आपल्या समाजातील उद्योजकांनी कर्ज व्यवस्थापन शिकले पाहिजे, नियम पाळले पाहिजेत, कर्ज घेणे म्हणजे कर्ज देणाऱ्याला आपल्या उद्योगाचा हिस्सेदार बनविणे होय!
त्याचा हक्क प्रस्थापित होतो कर्ज ज्या कामासाठी घेतले तेथेच ते वापरले पाहिजे दुसरीकडे पैसे वळविणे ही धोक्याची घंटा होय! कर्जाची परतफेड करणाऱ्यांमध्ये मराठी उद्योजक अग्रेसर आहेत
परंतु हप्ते वेळेत न भरल्यास खाते NPA मध्ये जाते, कर्ज वसुलीसाठी बँक मागे लागते,
तो कर्ज वसुली करणाऱ्याच्या दबावात येतो आणि एखाद चुकीचं पाऊल उचलतो म्हणून पैशाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करता आलं पाहिजे.
वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप (VGBG) च्या माध्यमातून आपण व्यावसायिक उद्योजक यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि सर्व समाज बांधव एकत्र येऊन आर्थिक कणा मजबूत करणार आहोत.
उद्योजक मोठा झाला तर तो समाजालाही मोठा हातभार लावतो म्हणून आपण सर्वांनी संघटित होऊन मोठ्या प्रमाणात यशाचे शिखर गाठूया!💰🏆
एकच ध्यास, वैश्य समाजाचा विकास..

  • डॉ.संतोष कामेरकर आणि सहकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *