💰श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब का होतायतं?
ह्या सगळ्यांना एक कारण आहे, आणि ते कारण आहे आकर्षणाचा सिद्धांत🧲 (द लॉ ऑफ अट्रॅक्शन)
तुम्हांला माहीतीय..? जगातील फक्त पाच टक्के लोकांकडे एकुण संपत्तीच्या पंच्याण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. (ज्याना आपण गर्भ 💰श्रीमंत म्हणतो.) याच्या उलट म्हणजेच 95% लोकांकडे फक्त 5% पैसा आहे. ज्याना आपण गरीब म्हणतो…
हा योगायोग नाही, हा 🧲आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम..?
तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमची गाडी, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
मी लहानपणी 🚗🚕गाड्या धुवायचो, त्या धुवता धुवता मी विचार करायचो की माझ्याकडे ही या सर्व गाड्या असतील, मी त्याबाबत सतत विचार करायचो व स्वप्नं 🌈रंगवायचो…
कालांतराने हे सर्व खर होत गेल…
“ज्या ज्या 🚗गाड्या मी धुतल्या, त्या त्या सर्व 🚕 गाड्या मी विकत घेतल्या”
चांगले मित्र परिवार, चांगल्या संस्था, आनंद, आरोग्य, घर , 🏡फार्म हाऊस, जमीन-जागा, रिसॉर्ट व त्या सर्व गोष्टी ज्याचा मी सातत्याने विचार केला आणि कृती केली. त्या मला मिळाल्या.
मी जसा विचार करत गेलो (चांगला-वाईट) तस घडत गेलं…
मला कालांतराने समजायला लागल की यालाच🧲 आकर्षणाचा सिद्धांत. (द लॉ ऑफ अट्रॅक्शन) म्हणतात…
जो विचार कराल तसेच घडेल…
जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं,
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात, वगैरे वगैरे…
ज्या गोष्टीवर मन, 🎯लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला की, हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
तुम्हांलाही तुमच्या आयुष्यात🌈 सुख, समृद्धी, समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्यावर 😃स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोर जोरात म्हणा..! (सकारात्मक स्वयंम सूचना)
१) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
२) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
३) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
४) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परिवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
५) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
६) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
७) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
८) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
९) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे आणि ती जिंकली आहे.
१०) माझ्या आजुबाजूचे, अवती-भवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
११) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
१२) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
१३) मी निरोगी आहे,
याला पॉझिटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळी-वेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि खर्या करुन दाखवेल.
आणि हीच एका दृष्टीने
“ लॉ ऑफ अट्रॅक्शन ”
ची दणदणीत सुरुवात असेल…!
ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हांला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो.
आकर्षक चा सिद्धांत काम करतो. मी लाभार्थी आहे.
- डॉ.संतोष कामेरकर