March 11, 2025

HOME

नमस्कार
माझ्या वैश्य समाज बांधवांनो,
आपल्या समाजात उद्योजक घडले पाहिजेत, यशस्वी, श्रीमंत, करोडपती, आर्थिक सक्षम समाज म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे त्यासाठी आपण सर्व एकमेकांना मदत आणि सहकार्य करायचे आहे म्हणूनच … Vaishyaglobal | वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप | VGBG

एकमेकांनी एकमेकांना पाडण्याचा प्रयत्नात सर्वच पडतात, परंतु एकमेकांनी एकमेकांना सावरण्याच्या प्रयत्नात सर्वच सावरतात.🏆


करोडपती, श्रीमंत, यशस्वी व्यक्ती या समाजाला हातभार लावत असतात त्यामुळे समाजाने वैश्य व्यावसायिक व्यापारी उद्योजक यांना सहकार्य करावे. या ग्रुप सोबत उद्योजक व्यक्तिंना जोडावे.

फक्त व्हाट्सअप ग्रुप वरती जाहिरात करून बिजनेस मिळत नाही.
लोकांचा “विश्वास” संपादन करायला हवा, विश्वास एकमेकाला समजून, बोलून, प्रत्यक्ष भेटून आणि चांगल्या व्यवहारातून निर्माण होत असतो.
आपण इतरांना मदत करायला हवी तरच आपल्याला मदत मिळेल
एकमेकांशी परिचय करून घ्या.
बैठका घ्या, पैसा, धंदा, भांडवल रीफरेन्स, कनेक्ट याबद्दलच चर्चा करा, कारण या ग्रुपचा एकच उद्देश आहे 💰बिजनेस, बिजनेस आणि बिझनेसच

संपूर्ण जगातील वैश्य व्यावसायिक व्यापारी उद्योजक यांना एकत्र करायची ही चळवळ आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध रीतीने कार्य करूया.

Vaishyaglobal या संस्थेच्या वतीने पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत

.
1)रिफरेंस शेअरिंग आणि नेटवर्किंग मीटिंग चे आयोजन,
2)उद्योजकांना व्यवसाय मेंटॉरिंग (Hand Holding),
3) फॅक्टरी व इंडस्ट्रियल व्हिजिट चे आयोजन,
4) यशस्वी उद्योजक उद्योगपती यांच्या भेटीगाठी घेणे.
5) जगभरातील उद्योजकांची डीरेक्टरी बनविणे
6) यशस्वी उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे.
7) व्यवसायासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी मार्गदर्शन.
8) उद्योगधंदा वाढीसाठी विभाग वार मार्गदर्शनपर मेळाव्यांचे आयोजन करणे


वैश्य समाजातील उद्योजकांची प्रगती हाच या मागचा एकमेव उद्देश आहे.

सर्व समाज संस्थांना आणि दानशूर व्यक्तींना आम्ही नम्र विनंती करीत आहोत की आमच्या या वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप सदस्यांना आपल्या संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करावे. (बैठकीसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांना आमच्या सोबत जोडून देणे) जेणे करून आपल्या समाजातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात एकमेकांना मदत करता येईल आणि आर्थिक कणा मजबूत करता येईल भविष्यात हेच उद्योजक आपली समाज संस्था आणखीन मोठी करण्यासाठी सहकार्य करतील.🙏


वैश्य समाज बांधवांना मदत करूया. हेवे दावे, रुसवे फुगवे विसरून एकमेकांना सहकार्य करूया!


एकमेकांना मोठं करूया !!
हा माझा ग्रुप आहे
हा माझा समाज आहे आणि
तो मलाच मोठा करायचा आहे.
पुढाकार घ्या..!
एकच ध्यास… वैश्य समाजाचा विकास…🏆
-डॉ.संतोष कामेरकर आणि सहकारी

Vaishyaglobal Prayer